Wednesday, March 12, 2025

केरळच्या आरोग्यमंत्र्यांना संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात बोलण्याचे आमंत्रण.

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- केरळच्या आरोग्यमंत्र्यांना संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात बोलण्याचे आमंत्रण देण्यात आले. कोवीड-१९ विरुद्ध प्रभावी प्रतिकार करणाऱ्या केरळने आणखी एक ठसा उमटवला आहे.

आरोग्यमंत्री के. शैलेजा  यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘पब्लिक सर्व्हिस डे’ च्या कार्यक्रमात वक्त्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कोविड -१९ च्या साथीच्या रोगविरोधात सर्व जगभर  महामारीच्या अग्रभागावर काम करणाऱ्या सार्वजनिक सेवकांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

“स्वच्छता, समाज कल्याण, शिक्षण, टपाल वितरण, वाहतूक, कायदा अंमलबजावणी यासारख्या क्षेत्रात तसेच आरोग्य सेवेत काम करणे किंवा आवश्यक सेवा पुरविणे असो आदी क्षेत्रात जागतिक स्तरावर सार्वजनिक सेवकांनी काम करणे सुरूच ठेवले आहे. 

त्यांचा सनःमान करण्यात कार्यक्रम आयोजित केल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एका निवेदनात म्हटले आहे.

निवेदनानुसार, थेट व्हिडिओ कार्यक्रमातील मुख्य वक्त्यांमध्ये अँटनिओ गुटेरेस, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस, तिजनी मुहम्मद-बांदे, महासभेचे अध्यक्ष एच. ई. सुश्री साहले-वर्क झेवडे, इथिओपियाचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस, डॅनॉम घब्रीयसस, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक लियू झेनमीन, संयुक्त राष्ट्र संघटनेचे आर्थिक व सामाजिक कार्य-सचिव-चिनी यंग, ​​आंतरिक व सुरक्षा मंत्री प्रजासत्ताक कोरिया, डॉ. इन-जे ली, गृहनिर्माण व सुरक्षा प्रजासत्ताक उपमंत्री, जिम कॅम्पबेल, संचालक, आरोग्य कर्मचारी दल विभाग, जागतिक आरोग्य संघटना, अ‍ॅनेट कॅनेडी, आंतरराष्ट्रीय परिचारिका अध्यक्ष व रोजा पावनेल्ली, सरचिटणीस, जनता सेवा आंतरराष्ट्रीय. आदींचा समावेश असणार आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles