Friday, July 12, 2024
Homeविशेष लेखमहिला विशेषजागतिक महिला दिन : हाताची मूठ आवळून निडर आणि निर्भीडपणे लढणारी काॅम्रेड

जागतिक महिला दिन : हाताची मूठ आवळून निडर आणि निर्भीडपणे लढणारी काॅम्रेड

“वार नाही तलवार आहे.

ती समशेरीची धार आहे.

स्त्री म्हणजे अबला नाही.

ती तर धगधगता अंगार आहे.”

आज जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतात. यानिमित्ताने आज मी एक अशा महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकत आहे. ती गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यासह , राज्यभरातील गोरगरीब, कष्टकरी, कामगार याच बरोबर आरोग्य विभागाचा कणा असलेल्या जिल्ह्यातील शेकडो आशा  व गटप्रवर्तक, घरकामगार महिला, अंगणवाडी सेविका, कामगार क्षेत्रातील वेगवेगळ्या महिला व पुरूष कामगारांचा आवाज बनून त्यांच्या न्याय हक्कासाठी सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन (सी.आय.टी.यु) या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर निडर आणि निर्भीडपणे खाद्यावर लाल झेंडा घेऊ हाताची मूठ आवळून रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या काॅम्रेड उज्वला पडलवार यांना जागतिक महिला दिनाच्या क्रांतिकारी शुभेच्छा.

काॅम्रेड उज्वला काशिनाथ पडलवार यांचा जन्म  ४ ऑगस्ट १९९४ रोजी नांदेड जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या दुष्काळग्रस्त किनवट तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या सावरगाव या छोट्याशा गावात सर्वसामान्य कुटुबांत त्यांचा जन्म झाला झाला. त्यांचे बालपणीचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. व पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण हे किनवट येथील महात्मा ज्योतिबा फुले या शाळेत झाले. तर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण हे धानोरा येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये पुर्ण केले.आणि पुढील उच्चशिक्षण घेण्यासाठी त्या नांदेड मध्ये आल्या आणि सी.टू संघटनेत सहभागी झाल्या. त्यांच्या कुटुंबातील आई वडील हे कम्युनिस्ट चळवळीत काम करत असल्यामुळे उज्वला पडलावर यांना लहानपणा पासूनच सर्व सामान्य , गोरगरिबांच्या मूलभूत प्रश्नाबद्दल तळमळ होती. त्यामुळे अन्यायाविरोध्दात लढण्याचे बाळकडू बालपणापासूनच घरातून मिळाले असल्याने पुढे चालून त्या कामगार चळवळीत सक्रीय सहभागी झाल्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य तथा कामगार नेते काॅम्रेड विजय गाबणे यांच्या नेतृत्वाखाली उज्वला यांनी सिटू या संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्याची सुरूवात केली.

उज्वला ११ वी त असताना सिटू च्या संपर्कात आल्या व तेव्हापासून त्या संघटनेत काम करत आहेत. “कम्युनिस्ट पक्षाशी” संलग्न असणाऱ्या या संघटनेत काम करणारी उज्वला देखील कम्युनिस्ट विचारांवर चालणारी व नेतृत्व म्हणून पुढे येणारी कार्यकर्ती असल्याचे जाणवते. जिल्हाभरात त्यांनी कामगार, मजूर, कर्मचारी, घरकामगार महिला, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बांधकाम कामगार, उमेद कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, असंघटीत कामगार, हाॅकर्स, मजदूर महिला यांच्या गावा गावात संघटना उभ्या करून त्यांच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचे कार्य केले. 

वेळप्रसंगी शासनदरबारी मोर्च, उपोषण, आंदोलन, रास्ता रोको करून कामगारांना न्याय मिळवून दिले. त्यामुळे ‘ती’नं केलेल्या प्रत्येक कार्याचा आम्हाला अभिमान आहे; असं काॅम्रेड उज्वला पडलवार यांच्या कुटूंबीयाकडून बोलले जाते. काॅम्रेड उज्वला यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद, तहसिल, पंचायत समिती आदी प्रशासकीय कार्यालयावर शेकडो मोर्चे, आंदोलन, रास्ता रोको केले. आणि कामगारांना न्याय मिळवून देण्याचे मोलाचे कार्य केले. काम करण्याची धडपड आणि तळमळ पाहून त्यांना अत्यंत अल्पावधीतच सिटू संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष हे पद देण्यात आले. आणि त्या अत्यंत कमी वयात देशातील सर्वात मोठी कामगारांची संघटना असलेल्या सिटू संघटनेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला जिल्हाध्यक्ष होण्याचा बहूमान मिळविले.

सिटू च्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या मागण्या घेऊन सातत्याने आंदोलन, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो असे अनेक आंदोलन करून कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे कार्य करत असताना काॅम्रेड उज्वला पडलवार यांना अनेक वेळा आंदोलनातून अटक देखील करण्यात आले, वेळ प्रसंगी कामगरांसाठी त्यांनी लाठ्या काठ्या अंगावर झेलल्या, अनेक वेगवेगळ्या आंदोलनात त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले. तरी सुद्धा त्या न डगमगता खंबीरपणे आपला लढा अधिक तीव्र करून कामगारांचा लढा चालूच ठेवले त्यामुळे त्या आज देशातील सर्वात मोठी कामगारांची संघटना म्हनून ओळख असलेल्या सिटू  या संघटनेच्या राज्य सचिव पदापर्यंत पोहोचल्या. आणि राज्यभरातून त्या आज कामगारांचे नेतृत्व करतात. आशा व गटप्रवर्तक यांना राज्यसरकार कडून मानधन देण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी २०१९ मध्ये  १७ दिवसाचा संप करून नांदेड च्या आसना टि पाँईट जवळ हजारो आशाताईना घेऊन हैदराबाद ते  नागपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल चार तास अडवून धरले. तेव्हा याचे पडसाद राज्यभरात उमटले आणि राज्यसरकारने आशाताईच्या मागण्या मान्य केले. तसेच कोरोना महामारीत आपल्या जीवाची पुर्व न करता काम करणाऱ्या शहरी भागातील आशाताईना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावी ही मागणी लावून धरली व महापालिकेच्या माध्यमातून  प्रतिमहा तिन हजार प्रोत्साहन भत्ता मिळवून देण्याचे काम उज्वला यांनी केले.

काॅम्रेड उज्वला यांचा परिचय घेताना त्या एकंदरीत डाव्या चळवळीतून वर आलेल्या कार्यकर्ती असल्याचे दिसते. आंदोलने व मोर्चे काढून न्याय – हक्कासाठी सतत संघर्ष करणे, हा तिचा पिंड दिसून येतो. काॅम्रेड उज्वला आणि त्यांच्या कार्याला आज जागतिक महिला दिनानिमित्ताने क्रांतिकारी सलाम व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

– पवन जगडमवार 

एम .ए / एम.एस.सी इलेक्ट्राॅनिक मिडीया प्रथम वर्ष ( माध्यमशास्त्र संकुल ) 

स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय