हडपसर / डॉ.अतुल चौरे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व जिल्हा क्रीडा विभागीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे अंतर महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक राजहंस दडलेला असतो. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेबरोबर कला आणि क्रीडा या गुणांचा विकास व्हावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आह़े. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. असे मत प्राचार्य डॉ.गायकवाड यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अँडव्होकेट स्मिता निकम या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन चेतन तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे, महाविद्यालय विकास समिती सदस्य अमर तुपे हे उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे संयोजन फिजिकल डायरेक्टर दत्ता वासावे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे, प्रा.किसन पठाडे, प्रा.अजित जाधव व कार्यालयीन अधिक्षक शेखर परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ज्योती किरवे यांनी केले. अंतर महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील 74 खेळाडू (मुले व मुली) उपस्थित होते.

