Tuesday, September 27, 2022
Homeजिल्हासातारा जिल्हा परिषदेवर आशा व गटप्रवर्तकांची तीव्र निदर्शने

सातारा जिल्हा परिषदेवर आशा व गटप्रवर्तकांची तीव्र निदर्शने

जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत संप सुरूच राहिल – कॉ. आनंदी अवघडे 

सातारा, दि. २१ : आज आशा व गटप्रवर्तक फेेडरेशनच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेवर जोरदार निदर्शने करण्यात आली.

 

१५ जून २०२१ पासून राज्य व्यापी बेमुदत संप पुकारला आहे. त्यात सातारा जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गट प्रवर्तक सहभागी आहेत. आज संपाचा सातवा दिवस आहे पण अजून आपले सरकारने काहीही दखल घेतली नाही. 

सरकारने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाहीत तर बेमुदत संप चालूच ठेवण्याचा निर्धार  आशा व गटप्रवर्तकांअसल्याची माहिती संघटनेच्या राज्य अध्यक्षा कॉम्रेड आनंदी अवघडे यांनी सांगितले.

■ आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

● सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करा.

● आशा व गटप्रवर्तकाना आरोग्य कर्मचारी म्हणून केले पाहिजे.

● आशाना १८,००० रू. व गटप्रवर्तकाना २२,००० रू. वेतन मिळाले पाहिजे. 

● आशा व गटप्रवर्तकाना प्रतिदिन ३०० रू. कोविड भत्ता मिळाला पाहिजे. 

● आशा व गटप्रवर्तकाना माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा सर्व टप्प्याचा मोबदला मिळाला पाहिजे. 

● कोरोना बाधित आशा व गटप्रवर्तक व त्यांच्या कुटुंबियांना व्हेंटिलेटरसह बेड राखीव ठेवण्यात यावेत.

● अँटीजेनचे टेस्टचे काम आशांवर लादू नये.

● आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 लाखाचा विमा कवच आहे, त्यामध्ये आशा व गटप्रवर्तक यांचा स्पष्ट उल्लेख करावा.

● आरोग्यवर्धिनी समूह मध्ये गटप्रवर्तकना १५०० रू. दरमहा मोबदला द्यावा.

● प्रेरणा प्रकल्प रिपोर्टिंग साठी गटप्रवर्तकना १५०० रू सहामाही भत्ता व स्टेशनरी साठी ३००० रू. वार्षिक रक्कम द्यावी.

◆ आरोग्यसेविका भरतीमध्ये आशा व गटप्रवर्तक ना 50 टक्के आरक्षण मिळावे.  

● आशांना योजनाबाह्य व मोबदला नसलेले काम देऊ नये. 

● दरमहा मोबदल्याची हिशोब पावती आशा व गटप्रवर्तकांना द्यावी. 

यावेळी कॉ. आनंदी अवघडे, कल्याणी मराठे, कॉ. माणिक अवघडे, कॉ. अशोक जाधव, कॉ. सुभाष मदने, कॉ. सलीम अत्तार, सायली अवघडे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चात उपस्थित होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय