कोल्हापूर, दि. ८ : इन्श्युरन्स कंपन्यांनी कोरोना पेशंटना बिले त्वरीत आदा करावीत अशी मात्र कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समिती च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनातील मागणी संदर्भात माझ्या अधिकारातील योग्य ते आदेश देतो. विमा पॉलिसी क्लेम संदर्भात शासनाला कळवतो असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, जगाबरोबर कोल्हापूर मध्येही कोरोना महामारीचा उद्रेक चालू असुन जनता पिळून निघाली आहे. यातच कोरोना पेशंटवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमधुन पेशंट व नातेवाईकांची अक्षरशः लुटमार सुरु आहे.
कृती समितीच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
● सर्वच खाजगी हॉस्पिटलमध्ये शासकीय नियमाप्रमाणे तज्ञ प्रशिक्षित स्टाफ असणारी आय.सी.यु. युनिट कार्यरत आहेत का याची चौकशी व्हावी.
● कोणत्याही हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागामध्ये उपचाराचे दरपत्रक (उदा. रुम भाडे, नर्सिंग चार्जेस, आय.सी.यु.भाडे) नाहीत ते त्वरीत लावावे. जेणेकरुन दरपत्रक बघुन बिलाचा अंदाज येईल.
● हॉस्पिटलमध्ये मेडीकल दुकाने आहेत, तेथेच औषधे घेण्याची सक्ती केली जाते. त्या ठिकाणी औषधाचा दर बाहेरच्यापेक्षा ५० ते ६०% जास्त आहे. या दुकानांना शासकीय मान्यता आहे काय ? ती दुकाने त्वरीत बंद
करावीत.
● सर्व हॉस्पिटलमध्ये शासकीय दराप्रमाणे बील आकारणी करुन शासकीय ऑडीटरकडून बील तपासणी करुनच बिले भरुन घ्यावीत.
● सर्व आय.सी.यु.च्या युनिटमध्ये असणारे सी.सी.टी.व्ही. वरुन दर तासांनी पेशंट नातेवाईकांना आपआपल्या पेशंटची स्थिती बाहेरील रुममध्ये दाखविण्याची व्यवस्था करावी.
● सर्व हॉस्पिटल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिकाराखाली आहेत. त्यांनी या हॉस्पिटलची दैनंदिन तपासणी करुन तसा अहवाल सादर करणेत यावा.
● सर्वात जास्त कोरोना मयत कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. त्याचे ‘डेथ ऑडीट’ त्वरीत करुन जनतेसमोर जाहीर करावे.
निवेदन देतेवेळी अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, प्रमोद पुगावकर, चंद्रकांत पाटील, राजेश वरक अंजुम देसाई, लहुजी शिंदे, विजय पोळ उपस्थित होते.