मुंबई, दि.29 : दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ (university) स्थापन करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
मंत्रालयात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. (university)
मंत्री पाटील म्हणाले, या विद्यापीठाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, आणि त्यामुळे त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल, विद्यापीठाचा प्रस्ताव तयार करताना या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ्यक्रमांसोबतच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन आणि इतर उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल असा प्रस्ताव तयार करावा. प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
या निर्णयामुळे दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच गती मिळेल असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा :
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी
Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती