Tuesday, April 16, 2024
Homeजिल्हागणपती व सरस्वतीच्या ऐवजी डॉ.आनंदीबाई जोशी व डॉ.रखमाबाई राऊत ह्यांचे पुतळे बसवा...

गणपती व सरस्वतीच्या ऐवजी डॉ.आनंदीबाई जोशी व डॉ.रखमाबाई राऊत ह्यांचे पुतळे बसवा – डॉ.डी.एल.कराड यांची मागणी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे गणपती व सरस्वतीच्या मूर्ती बसविल्या जाणार आहेत. त्या ऐवजी भारतातील क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर, डॉ.आनंदीबाई जोशी व डॉ.रखमाबाई राऊत ह्यांचे पुतळे बसवावेत, अशी मागणी सिटू कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांनी केली आहे.

डॉ. कराड म्हणाले, एक अवचित घडते आहे. भारतातल्या सरकारी विद्यापीठात असे पहिल्यांदाच घडत आहे. महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय, आयुर्वेद व होमिओपॅथी तसेच नर्सिंग महाविद्यालयांच्या साठीचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विद्यापीठाच्या आवारात गणपती व सरस्वती यांच्या मूर्ती बसवण्याचा निर्णय होऊन टेंडर निघाले आहेत.

विद्यापीठ विज्ञानाचे आणि तिथे हे असं घडतंय. वैज्ञानिक दृष्टिकोन पायदळी तुडवले जात आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे व त्याचा विकास करणे हे भारतीय संविधानातील कलम 51 क नुसार प्रत्येक भारतीयाचे मूलभूत कर्तव्य देखील आहे. विद्यापीठांवर देखील ही जबाबदारी आहे.

डॉ. कराड पुढे म्हणाले, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारण्यात आले आहे. हे विद्यापीठ सरकारी आहे. तेथे धर्मनिरपेक्षतेचे पालन झालेचच पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दोन क्रांतिकारक महिला डॉक्टर जन्माला येऊन गेल्या. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ.आनंदीबाई जोशी तसेच भारतातील पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर डॉ.रखमाबाई राऊत यांनी भारतात इतिहास घडवला आहे. या दोन्ही महिला डॉक्टरांचे पुतळे ह्या विद्यापीठामध्ये उभारावेत.

डॉ. रखमाबाई राऊत या तर भारतातील स्री चळवळी मधील आद्य बंडखोर. 1885 च्या काळात ‘नवऱ्याकडे नांदायला जात नाही’ असे ठणकावून सांगणाऱ्या आणि संमती वयाचा मोठा प्रश्न हाती घेणाऱ्या डॉ.रखमाबाई राऊत….! म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा मध्ये गणपती आणि सरस्वती नव्हे तर डॉ.आनंदीबाई जोशी आणि डॉ.रखमाबाई राऊत या क्रांतिकारक महिला डॉक्टरांचे पुतळे बसवले गेले पाहिजेत, असेही दाभाडे म्हणाले.

म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा मध्ये गणपती आणि सरस्वती यांच्या मूर्ती ठेवणे आवश्यक नाही. व्यक्तिगत जीवनात आपल्या काय श्रद्धा असाव्यात याला घटनेने स्वातंत्र्य दिले आहे, परंतु सरकारी विद्यापीठांमध्ये आपल्या श्रद्धा प्रस्थापित करणे योग्य नाही व घटनेला धरूनही नाही. या सर्व बाबींचा विचार करून डॉ.आनंदीबाई जोशी आणि डॉ. रखमाबाई राऊत या क्रांतिकारक महिला डॉक्टरांचे पुतळे बसविणे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल. ही महाराष्ट्राची अस्मिता देखील आहेच… ह्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन व धर्मनिरपेक्षता यांचे देखील पालन होईल, असेही डॉ. कराड म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय