मुंबई : पेट्रोल, डिझेलपासून अन्न धान्यापर्यंत अनेक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे, या महागाईचा फटका सामान्य जनतेला बसत असताना आता सिमेंटच्या दरामध्येही मोठी वाढ होणार आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. या महागाईमुळे इतर खर्चात वाढ झाली आहे, त्यामुळे इंडिया सिमेंट कंपनीने दर पोत्यामागे ५५ रुपयांपर्यंत दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ एकाच वेळी केली जाणार नाही.
कंपनीचे उपाध्यक्ष आणि एमडी एन श्रीनिवासन सांगितले की, एक जूनला सिमेंट पोत्याचा दर २० रुपयांनी वाढविला जाणार आहे. त्यानंतर १५ जूनला आणखी १५ रुपयांनी दर वाढ होईल आणि त्यानंतर १ जुलैला २० रुपयांनी दरवाढ केली जाणार आहे. असे न केल्यास कंपनीला मोठे नुकसान झेलावे लागेल, असेही ते म्हणाले.
सिमेंटच्या वाढत्या या किंमतीमुळे आपसुकच घरांच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्यता आहे.