Wednesday, September 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयरशियाच्या गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

रशियाच्या गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

 

खारकिव्ह : युक्रेनमधील खारकिव्ह शहरावर रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात आणि गोळीबारात कर्नाटकातील नवीन शेखराप्पा या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत म्हटले की, “आम्ही दुःखी आहोत. खार्किवमध्ये आज सकाळी एका भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाला. मंत्रालय त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. आम्ही कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो.”

सहा दिवस सुरू असलेल्या या युद्धामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या शहरामध्ये अडकले आहेत. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे बहुतांश विद्यार्थी बॉम्ब शेल्टर मध्ये अडकून आहेत. पोलंड, हंगेरीच्या सीमेवर गेल्याशिवाय त्यांना कोणतीही मदत मिळू शकणार नाही. युक्रेन सरकारने कठोर संचारबंदी जाहीर केली आहे.

युक्रेनच्या विविध शहरात दोन्ही बाजूने धुमश्चक्री सुरू आहे. रशिया आणि युक्रेन मधील वाटाघाटी निष्फळ ठरल्या आहेत. परदेशी नागरिक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी सेफ स्पेस नाही. भारतीय विमान कंपन्या आणि हवाई दलाची विमाने पोलंड, हंगेरी येथून उड्डाण करू शकतात. मात्र विद्यार्थ्यांना युक्रेन बाहेर काढण्यासाठी अद्यापही कोणता राजनैतिक मार्ग सापडलेला नाही. कर्नाटकातील या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे केंद्रसरकार समोर मोठा पेच प्रसंग उभा आहे


संबंधित लेख

लोकप्रिय