भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत आणि दिवसेंदिवस तेथील परिस्थिती आणखीनच गंभीर होत चालली आहे. विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी संपले आहे. बर्फ वितळून त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय तसेच वापरण्याच्या पाण्याची सोय करावी लागत आहे .ही भीषणता आणखीनच वाढत आहे. कारण युक्रेन मध्ये सध्या -2 तापमानामध्ये सतत बर्फवृष्टी होत आहे .
खाण्यापिण्याचा साठा संपत चालला आहे. मागच्या आठवड्यामध्ये किराणा दुकानात खाण्याचे सामान आणण्यासाठी गेलेला नवीन या भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात मध्ये मृत्यू झाला आहे .त्याची भीती येथे बंकर ,मेट्रो स्टेशन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना वाटत आहे. आधीच युद्धजन्य परिस्थिती आणि आता पाणी टंचाई त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत .
विद्यार्थी प्रतिनिधींनी एका मुलाखतीदरम्यान भारतीय दूतावासाला कळकळीची विनंती केली आहे .आम्हाला येथे अत्यंत गर्दीमध्ये बंकर मध्ये राहावे लागत आहे .आम्हाला त्वरित मायदेशी परत देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.