हैद्राबाद – भारतीय मुस्लिमांचा आणि मुघलांचा काहीही संबंध नाही असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दिन ओवेसी यांनी केलं आहे. ओवेसी यांनी हा प्रश्न फेसबुकवर विचारला आहे.भारतीय मुसलमान आणि मुघलांचा काहीही संबंध नाही, पण हे सांगा की मुघलांच्या बायका कोण होत्या असा प्रश्न त्यांनी या पोस्टमध्ये विचारला आहे.
याच पोस्टमध्ये ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली आहे. संघामध्ये स्वाभिमान आणि सहानुभूती हे गुण शिकवले जात नाहीत. मदरशांमध्ये ते शिकवले जातात असं ओवेसी यात म्हणतात. या देशाला भारतीय मुसलमानांनी समृद्ध केलंय पुढेही करत राहातील असं ते म्हणतात.
नवीन भरती : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज
सुनो संघियों, भारत के मुसलमानों का त’अल्लुक़ इन अज़ीम हस्तियों से है। – Barrister @asadowaisi pic.twitter.com/Qz7zvwFXBg
— AIMIM (@aimim_national) May 25, 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत विविध पदांसाठी भरती
असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या अन्य एका व्हिडीओ ट्वीटमध्ये म्हटलं, आसाममध्ये पुरामुळे ७ लाख लोकांवर परिणाम झालाय, १८ लोकांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, आसामच्या मुख्यमंत्र्यांना आसामच्या जनतेच्या त्रासाशी काहीही देणंघेणं नाही. त्यांना मदरशांची काळजी वाटते आहे. इतिहासाचा कमकुवत विद्यार्थी असलेल्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की जेव्हा संघी लोक इंग्रजांशी हातमिळवणी करत होते आणि तुरुंगात इंग्रजांकडे माफीची भीक मागत होते, तेव्हा याच मदरशांच्या लोकांनी इंग्रजांच्या विरोधात जिहादचा फतवा काढला होता.
दावोस करार ; महाराष्ट्रात ६६ हजार रोजगार मिळणार !
दहशतवादी विरोधी पथकाने जुनेद मोहम्मदच्या आवळल्या मुसक्या !
बीड जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 वी ते वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी !