Saturday, October 5, 2024
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन !

भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन !

मुंबई : भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते.

शिवकुमार शर्मा हे उत्तम गायकही होते. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं. १९८५ मध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांना बाल्टिमोर या संयुक्त राज्याचं मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आलं आहे.

संतूर वाद्याचं त्यांना पुरेपूर जाण होती. त्यांनीच या वाद्यावर संशोधन करत या वाद्याला महत्त्व आणि दर्जा मिळवून दिला होता. त्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर वाद्याला कलात्मक जोड देत, हे वाद्य जगभरात पोहोचवले.

कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत रिक्त पदासाठी भरती, 12 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा निवड समिती, हिंगोली अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 13 मे 2022 शेवटची तारीख

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तब्बल 206 पदांसाठी भरती, 16 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय