पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.मेघना भोसले यांचे सहित वाडीया महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.वृषाली रणधीर आणि पुणे शहराचे माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांना नामांकित डॉ.बी.आर.आंबेडकर इंटरनॅशनल पुरस्कार आणि नेपाळ-इंडिया मैत्री इंटरनॅशनल पुरस्कार दि.१० ऑक्टोबर रोजी लुम्बिनी, नेपाळ येथे एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
बाबू जगजीवनराम कला, संस्कृती व साहित्य अकादमी आणि नेपाळ-भारत मैत्री संघ (नेपाळ-भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
प्रा.डॉ.मेघना भोसले या अर्थशास्त्राच्या पदवीधर आहेत. त्यांनी असंघटीत घरकाम करणाऱ्या महिला कामगार यांच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर एक अभ्यासपूर्ण प्रबंध लिहिला आहे. टिळक महाराष्ट विद्यापीठ, पुणे तर्फे त्यांना पीएचडी मिळाली आहे. पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील घरेलू कामगारांची उन्नती, त्यांचा सामाजिक, आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासकीय, संस्थात्मक कोणत्या योजना राबवल्या पाहिजेत? यावर त्यांनी प्रबंधामध्ये भर दिला आहे.
भारत आणि नेपाळ गरीब, सामाजिक मागास वर्गातील नागरिकांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्याकरीता नेपाळचे खासदार राम लखन यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला.
यावेळी बाबु जगजीवन राम कला व साहित्य अकादमी (भारत) चे एन.एस.खोबा, टी.ऐस.कुमार, सुनील मांडवे, प्रा.गोरख साठे व अनेक मान्यवर उपस्थित होते.