Sunday, September 8, 2024
HomeNews..अन् भारताचे मिसाइल थेट पाकिस्तानात जाऊन पडले

..अन् भारताचे मिसाइल थेट पाकिस्तानात जाऊन पडले

Photo : ANI

नवी दिल्ली :  भारतातून ९ मार्च रोजी चुकून एक मिसाइल सुटून थेट पाकिस्तानात जाऊन पडले होते. या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराने एक पत्रकार परिषद घेत भारतीय मिसाईल पाकिस्तानात पडल्याचे सांगितले. तसेच काही भागात नुकसान झाल्याचे म्हटले होते. या घटनेवर भारत सरकारने खेद व्यक्त केला आहे. सुरक्षा मंत्रालयानं शुक्रवारी याबाबत अधिक माहिती जारी केली आहे.

पाकिस्तानने गुरुवारी सांगितले कि, एक भारतीय मिसाईल पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरलं आणि ते मियाँ चन्नू भागात कोसळल्याने त्या भागात थोडं नुकसान झालं आहे. याबद्दल भारताने याची गंभीर दखल घेत उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी केले आहेत. 

भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे की, तांत्रिक बिघाडीमुळे 9 मार्चला आकस्मित मिसाईल डागली गेली. नेहमीच्या देखभाल प्रक्रियेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हे मिसाईल पाकिस्तानच्या भागात मिसाईल पडले. ही दुर्घटना अत्यंत खेदजनक असून या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. असे भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय