By elections : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला कडवी झुंज दिल्यानंतर आता इंडिया आघाडीने सात राज्यांतील १३ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत एनडीएला चांगलीच लढत दिली आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांतील उमेदवारांनी १३ पैकी १० ठिकाणी विजय मिळविला आहे. तर भाजपाला केवळ २ जागा जिंकता आली असून, एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. (By elections)
बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यातील १३ जागांवर बुधवारी (दि.१० जुलै) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. विविध पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या मृत्यूमुळे किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांमुळे पोटनिवडणूक घेण्यात आली. यात बिहारमधील रुपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला, तामिळनाडूमधील विक्रवंडी, मध्यप्रदेशातील अमरवारा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगळौर, पंजाबमधील जालंधर पश्चिम आणि हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढ या जागांचा समावेश होता.
पश्चिम बंगालमधील चारही जागांवर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. तर उत्तराखंडमधील आणि हिमाचल प्रदेशमधील प्रत्येकी दोन व मध्यप्रदेशमधील एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. तसेच हिमाचलमधील एका जागेवर भाजपाच्या उमेदवाराने विजय मिळविला आहे. याशिवाय तामिळनाडूतील एका जागेवर डीएमके, तर पंजाबमधील जालंधर मतदारसंघातून आम आदमी पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. तसेच बिहारमधील एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपला अनेक महत्त्वाच्या जागांवर पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. यातील सर्वात दणदणीत पराभव उत्तराखंडमधील बद्रीनाथ मतदारसंघात मानला जात आहे. बद्रीनाथ हे चार धाम अंतर्गत येत असून विविध पौराणिक ठिकाणी विकासकामे होत असतानाही हा पराभव भाजपसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. येथे काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे.
by elections
या निकालानंतर इंडिया आघाडीच्या विजयाने एनडीएसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. आगामी निवडणुकांसाठी ही पोटनिवडणूक एनडीएसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.


हेही वाचा :
धक्कादायक : बागेतील आंबे खाल्ल्याने अल्पवयीन मुलांना झाडाला बांधून मारहाण
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!