Friday, April 19, 2024
HomeNewsआशा व गटप्रवर्तकांचे बेमुदत मुक्कामी आंदोलन सुरू

आशा व गटप्रवर्तकांचे बेमुदत मुक्कामी आंदोलन सुरू


नाशिक : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या कोरोना प्रोत्साहन भत्ता 24000/- रुपये मिळावा यासाठी नांदगांव पंचायत समिती समोर आज मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी 12.30 वाजता आशा स्वयंसेविका यांचे मुक्कामी आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान या बाबतचे पत्र गटविकास अधिकारी यांना देण्यात आले असून त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत कोरोना प्रोत्साहन भत्ता 24000/- रुपये चे चेक मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी भूमिका नाशिक जिल्हा आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (CITU) संघटनेच्या वतीने घेण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व काॅम्रेड विजय दराडे, काॅम्रेड कल्पना शिंदे, दिपाली कदम, इंदुमती गायकवाड, चित्रा तांबोळी, शितल आहेर, शारदा निकम, रोहिणी आहेर, मनीषा पाथरे, लता लाठे, दिपाली सानप, वृषाली बोरगुडे, स्वाती खैरनार प्यारीबाई राठोड, सुप्रिया पाटील, वंदना जगताप, उज्वला खताळ, छाया सोनवणे, संगिता सोनवणे यासह मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय