|
Photo : @DrKumarVishwas/ Twitter |
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खलिस्तान समर्थकांशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कुमार विश्वास यांना केंद्र सरकारने वाई श्रेणीची सुरक्षा दिली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी सहकारी आणि आम आदमी पार्टीचे माजी नेते कवी कुमार विश्वास यांनी बुधवारी केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केला. केजरीवाल हे पंजाबमधील फुटीरतावाद्यांचे समर्थक असल्याचे त्यांनी म्हटले होते.
शिवजयंती निमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन, राहुल गांधींचे देखील मराठीत ट्विट !
तसेच, केजरीवाल फुटीरतावाद्यांची मदत घेण्यास मागे पुढे पाहत नसल्याचा दावा विश्वास यांनी केला होता. कुमार विश्वास यांच्या या आरोपानंतर यांना सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने CRPF कव्हरसह Y श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कुमार विश्वास यांच्या वतीने सांगण्यात आले की, या आरोपांनंतर आता त्यांना धमक्या मिळू लागल्या आहेत. कुमार विश्वास म्हणाले की, जे लोक कॉल करत आहेत, व्हॉट्सअॅपवर धमक्या देत आहेत, त्यांनी समजून घ्यावे की मी धमक्यांना घाबरत नाही.
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा, दिग्गजांची उपस्थिती