Wednesday, August 17, 2022
Homeशहरपिंपरी चिंचवड : वाढीव वीज बिल, मीटर बदला, महावितरणला आंदोलनाचा इशारा

पिंपरी चिंचवड : वाढीव वीज बिल, मीटर बदला, महावितरणला आंदोलनाचा इशारा

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पिंपरी चिंचवड : चिखली घरकुल या सोसायटीमधील नागरिकांच्या लाईट मीटर व बिलाबाबत खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. विद्युत मिटर  फॉल्टी आहेत, त्यामुळे वाढीव वीजबिल येत आहे.  याबाबत नागरिकांनी तक्रार करूनही गेल्या दोन वर्षापासून हे मीटर बदलण्यात आले नाहीत. अनेक समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अन्यथा नाइलाजास्तव विद्युत पुरवठा कार्यालय थरमॅक्स चौक येथे आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपा शहर उपाध्यक्ष अजय पाताडे यांनी मोशी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घरकुल येथील नागरिकांना येणारे भरमसाठ बिल वीज पुरवठा खंडित करून जबरदस्तीने वसूल केले जात आहे. शिवाय तक्रार करायची म्हटली तर घरकुल पासून चार ते पाच किलोमीटरचे अंतर मोशी आणि थरमॅक्स चौकामधील ऑफिसमध्ये पाठवतात यामध्ये नागरिकांचा वेळ, पैसा व मनस्तापही सहन करावा लागतो, कोरोनाच्या काळामध्ये मुलांचं शिक्षण ऑनलाइन असल्याने तसेच काही आयटी मधील मुलं यांच ही काम घरून चालू असल्याने नागरिकांचा नाईलाज आहे त्या परिस्थितीमध्ये लाईट बिल भरून महावीतरची  दंडेलशाही स्वीकारावी लागत आहे. कोरोना काळामध्ये आर्थिक विवंचनेने त्रस्त असलेल्या नागरिकांना या भरमसाठ वीज बिलापाई मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत, आम्ही आपल्याला या पत्राद्वारे विनंती करीत आहोत येत्या आठ दिवसांमध्ये या नागरिकांच्या तक्रारी समजून घेण्याकरिता घरकुल येथे आपल्या सोयीनुसार आपण उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात ही विनंती. अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला विद्युत पुरवठा कार्यालय थरमॅक्स चौक येथे आंदोलन करावे लागेल. 

या निवेदनावर भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची स्वाक्षरी आहे.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय