धारूर : राज्यातील १ ली ८ वी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणाऱ्या कामगाराना ७ हजार ५०० रुपये अशी मानधनात वाढ करा, इत्यादी सह अनेक प्रलंबित मागण्याचे लेखी निवेदन राज्याचे शिक्षण संचालक यांना देण्यात आले.
महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालक कार्यालयातील शालेय पोषण आहार अधिक्षक सुरेश वाघमोडे यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. शालेय पोषण आहार कामगारांना इतर राज्याप्रमाणे मानधनात वाढ करा, ज्या कामगाराचे वय ६५ वर्षे झाले आहे, त्या कामगारांना सेवा समाप्तीच्या वेळी ५०,००० रूपये सानुगृह अनुदान देऊन त्यांना ३००० रूपये पेन्शन द्या, हजेरी पटसंख्यानुसार त्याच कुटुंबातील दुसऱ्या कामगाराची नियुक्ती करा, कोल्हापुर जिल्हयातील नोहेंबर ते मार्च या महिण्याचे मार्च अखेर थकित मानधन दिले जाईल इत्यादी सह अनेक प्रलंबीत मागण्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे, केंद्रीय कमिटी सदस्य प्रा. ए बी पाटील, राज्य सचिव डॉ अशोक थोरात, कॉ. मन्सुरभाई कोतवाल, मिरा शिंदे, कुसुमताई देशमुख, अनिल कराळे, अमोल नाईक, रमेश पंचाळ इत्यादी राज्य पदाधिकारी उपस्थित होते.