नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर कार्यरत ग्रामरोजगारसेवक यांना अल्प मानधन वर कार्यरत होते. यासाठी महाराष्ट्र तिल 17 हजारांवर ग्राम रोजगार सेवक सातत्याने आंदोलन सुरू होते. दरमहा निश्चित मानधन द्यावे ही मागणी होती. या संदर्भात 8 मार्च 2021 रोजी शासन निर्णय प्रमाणे 750 वर मनुष्यबळ दिवस निर्माण केल्यावर दरमहा 2000 रुपये मिळणार आहे. 1500 ते 2500 मनुष्यदिवस निर्मिती केल्यावर 3 हजार रुपये दरमहामिळतील. ग्रामीण भागात अधिक रोजगार हमी हमीची कामे जाल्यास दरमहा 7 हजार वर मानधन मिळू शकणार आहे.
मानधन आता दरमहा ग्राम रोजगार सेवक च्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. या शासन निर्णयचे आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना आयटकने रोहयो मंत्री संदीपान बुमरे व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
मात्र सदर मानधन वाढ झाली तरी महागाई प्रचंड वाढत असल्यामुळे दरमहा प्रवास भत्ता 1 हजार रुपये द्यावा. व दरमहा ग्राम रोजगारसेवक ना जगण्याइतके किमान वेतन मिळावे यासाठी निर्णय व्हावा. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ने ग्राम रोजगार सेवकसाठी केलेला अभ्यासक्रम चे शुल्क ग्रामपंचायत, जिल्ह्यापरिषद, किंवा शासनाने भरावे. सामाजिक सुरक्षा अंतर्गत विमा संरक्षण, आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी लागू करावा अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना वतीने राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले, राज्य सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी केले आहे.
नाशिक जिल्हा ग्रामरोजगारसेवक बैठक राज्य अद्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली आयटक कामगार केंद्रात झाली. याप्रसंगी ग्राम रोजगार सेवक सुरेश फुफाने, धनंजय लोखंडे, मदन काकडे, राजेश पवार, आबा माळी, सोमनाथ गवळी, अनिल चव्हाण, अनिल बीचकूल, बाबासाहेब कदम, रमेश महाले, प्रदीप पवार, प्रदीप बनकर आदीसह उपस्थित होते.