मुंबई : शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. कर चुकवल्याप्रकरणी खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण’चे बँक खाते आयकर विभागाने गोठविली आहेत.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गटात गेलेल्या नेत्यांविरुध्द कारवाई थांबेल असे बोलले जात होते, मात्र शिंदे गटाच्या वाशिम – यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण’ संस्थेवर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. 8 कोटी 26 लाखांचा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.
आयकर विभागाने भावना गवळी यांना २९ डिसेंबर रोजी नोटीस दिली होती. त्यात ५ जानेवारी पर्यंत म्हणणे मांडायला सांगितले होते. मात्र भावना गवळी प्रत्यक्ष उपस्थितीत राहिल्या नाही. त्यांनी प्रतिनिधी पाठवून उत्तर दिले होते. मात्र त्यावर आयकर विभागाचे समाधान झाले नाही त्यानंतर ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त जात आहे.