कळवण / सुशिल कुवर : दिनांक २२ रोजी कनाशी येथे रक्षाबंधन सणाच्या औचित्य साधून नवीन कणसरा पेट्रोलियम पंपाचे उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष दिंडोरी विधानसभाचे आमदार नरहरी झिरवाळ तसेच कळवण – सुरगाणा विधानसभाचे आमदार नितिन पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हे पण पहा ! बैलगाडी शर्यती आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
या उद्घाटन कार्यक्रम सोहळाप्रसंगी कळवण पंचकृषितील अनेक मान्यवर उपस्थित होते. या उदघाटन सोहळ्याप्रसंगी नरहरी झिरवाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कळवण-सुरगाणाचे आमदार नितिन पवार यांचा सत्कार कणसरा पेट्रोलियमचे नंदलाल बहिरम यांच्या हस्ते करण्यात आला.
हे पण वाचा ! भारताची विक्री थांबवा, जनतेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे आवाहन !
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुमित्राताई बहिरम, कळवण तालुक्याचे तहसीलदार बंडू कापसे, कळवण पंचायत समिती सभापती मनिषा पवार, उपसभापती विजय शिरसाट, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नाशिक जिल्हाध्यक्ष रावण चौरे, उपाध्यक्ष के. के गांगुर्डे, ग्रामपंचायत कनाशी सरपंच, बंडू पवा, ग्रामपंचायत कनाशी उपसरपंच सुनिता बोरसे, पोपट बहिरम तसेच संपूर्ण बहिरम परिवारसोबत अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
हे जरूर वाचा ! १९ विरोधी पक्षांची भारतीय जनतेला हाक ! केले संयुक्त निवेदन सादर