Friday, December 6, 2024
Homeग्रामीणसुरगाणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मानी येथे करोना लसीकरण सत्राचे उद्घाटन

सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मानी येथे करोना लसीकरण सत्राचे उद्घाटन

सुरगाणा (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मानी येथे करोना लसीकरण सत्राचे उदघाटन व शुभारंभ डॉ. दिलीप संभाजी रणवीर तालुका आरोग्य अधिकारी सुरगाणा व योगेश जाधव सरपंच मानी यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी आरोग्य सहाय्यक कैलास जाधव म्हणाले की, लसीकरण सत्रामध्ये ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील सर्वांना लसीकरण देण्यात येणार आहे, तसेच यापूर्वी करोना योद्धा कर्मचारी यांना लसीकरण करण्यात आलेले आहे व शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार वेळोवेळी सर्व लाभार्थ्यांना लसीकरणास आणायचे आहे. हाच आमचा एकमेव उद्देश आहे व जनतेला आमचे आवाहन आहे असे जाधव म्हणाले. तसेच या करोना महामारीच्या काळामध्ये शारीरिक अंतर, मास्क वापरणे, हात धुणे व गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. 

करोना लसीकरण सत्र प्रत्येक आठवठ्यातून तीन दिवस चालणार असून सर्व लाभार्थींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन करोना लसीकरण सत्रास प्रतिसाद द्यावा असे आव्हाहन देखील करण्यात आले आहे. यावेळी डॉ.मधुकर पवार, डॉ.सागर गवळी, डॉ.संजीवनी सुर्यवंशी सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय