Wednesday, June 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आपच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ प्रमुख मार्गदर्शन शिबिर संपन्न

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने चिंचवड येथील चैतन्य सभागृह येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पार्श्वभूमी वरती बूथ प्रमुख व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शन आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटक विजय कुंभार व पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात महिला अध्यक्ष स्मिता पवार यांनी संविधान प्रत वाचून केली.

यावेळी विजय कुंभार यांनी बोलतांना म्हटले, बूथप्रमुख हा पक्षाचा पायाभूत कार्यकर्ता असतो, बूथप्रमुखाचा प्रत्येक मतदाराशी संपर्क येतो, आम आदमी पार्टीमध्ये बूथप्रमुख हे महत्त्वाचे पद आहे. बूथ प्रमुखांनी त्या वार्डातील समस्या इच्छुक उमेदवारांना कळायचे असतात. आम आदमी पार्टीची भूमिका आणि पक्षाचे काम हे मतदारापर्यंत पोहोचविण्याचे काम हे बूथप्रमुखाद्वारे केलं जात असं त्यांनी म्हटले.

येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व जागा ताकतीनीशी लढवेल असे त्यांनी यावेळेस म्हटले, आम आदमी पार्टीमध्ये घराणेशाहीला थारा दिला जाणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता हाच आमचा उमेदवार आणि हाच जनतेचा प्रतिनिधी असेल असे त्यांनी प्रतिपादन केले.

जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी बोलताना म्हटले, गावकी भावकीच राजकारण न करता विकासाचा राजकारण पुढच्या काळात आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये करेल. पिंपरी चिंचवड करांना चांगल्या सुख सुविधा फक्त आम आदमी पार्टीच देऊ शकते असे त्यांनी म्हटले. या वेळी कमलेश रणवरे, प्रकाश घोळवे, दयानंद करवीर, योगीराज आघाव, रशीद अत्तार, अशा अनेकांचे पक्षप्रवेश करण्यात आले.

या वेळी शहराध्यक्ष अनुप शर्मा, कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, उपाध्यक्ष महेश बिराजदार यांनी पिंपरी चिंचवड मधील समस्या चा पाढा वाचला, व शहर प्रवक्ते प्रकाश हगवणे, डॉ. रामेश्वर मुंडे,यांनी प्रस्तावना केली.

या शिबिराचे नियोजन आप डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, सामाजिक न्याय विंग जिल्हा अध्यक्ष वहाब शेख, सीताताई केंद्रे, चंद्रमणी जावळे, मैमुना शेख, कमलेश रणवरे, यलप्पा वालदोर, संजय मोरे, कपिल मोरे, ब्रह्मानंद जाधव, दिपक श्रीवास्तव, सुशील अजमेरा, मोतीराम अगरवाल, सद्दाम पठाण, सिमा यादव, भिम मांगडे यांनी केले.

या वेळी उपस्थित स्वप्निल जेवळे, प्रीतम दराडे, मनोहर पाटील, सुखदेव गुंजाळ, त्रिवेणी हगवणे, ऋतुजा हगवणे, विद्या जाधव, सरोज कदम, राज चाकणे, डॉक्टर वाघज, मंगेश आंबेडकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिराची सांगता ही राष्ट्रगीताने झाली.

– क्रांतिकुमार कडुलकर

---Advertisement---
Lic Kanya Yojana
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles