Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

शिवसेनेबरोबर युतीत आमचा श्वास कोंडला होता – देवेंद्र फडणवीस

---Advertisement---

---Advertisement---

मुंबई / रवींद्र कोल्हे : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार असल्याने भारतीय जनता पक्षाला संधी आहे. जसा तुमचा श्वास कोंडत होता, तसाच आमचाही शिवसेना भाजप युती असतांना काही ठिकाणी श्वास कोंडत होता. मात्र आता राज्यात तीन पक्ष एकत्र आलेत, आता श्वास त्यांचा कोंडतोय. युती असल्याने पक्ष वाढीसाठी तेव्हा काही मर्यादा होत्या पण आता मोकळा श्वास घेतोय. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेत येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नारायणगाव गटातील शिवसेना जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी आज गुरुवार (दि.१९ ऑगस्ट ) रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आशाताई बुचके विधानसभेच्या तीन निवडणुका लढल्या. मात्र तीनही वेळेला घात झाल्याने त्या निवडून येऊ शकल्या नाहीत. मात्र आता आम्हाला १००% विश्वास आहे. की २०२४ मध्ये जुन्नरचा आमदार भारतीय जनता पार्टीचा असेल आणि आशाताई बुचके असतील. 

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, सुनील कर्जतकर, हाजी आरफत शेख यांच्यासह बुचके यांचे कार्यकर्ते नारायणगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आशिष माळवदकर, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles