पुणे : पुण्यात नुकताच कोट्यवधी रुपयांच्या किमतीचा ड्रग्ज साठा जप्त केल्याची बातमी ताजी असतानाच आता चक्क कांद्याच्या शेतीमध्ये ही अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याजवळील सासवड परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. In Saswad area, cultivation of opium in onion cultivation
सासवड परिसरातील कोडित गावात अफूची लागवड केलेली आढळून आली आहे. कांद्याच्या शेतीमध्ये ही अफूची लागवड करण्यात आली होती. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. दशरथ सीताराम बडदे (वय ६५), तानाजी निवृत्ती बडदे (वय ६९, रा. कोडित, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून दहा किलो ५०० ग्रॅम वजनाची अफूची बोंडे जप्त करण्यात आली असून, जप्त केलेल्या अफूच्या बोंडाची किंमत २१ हजार रुपये आहे. पुरंदर तालुक्यातील कोडित गावात कांदा शेतीत बडदे यांनी अफूची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला होता.
बडदे यांनी अफूची लागवड दिसू नये यासाठी कांदा आणि शेवंतीच्या फुलांची लागवड केल्याचे आढळून आले. बडदे यांना सासवड न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक राहुल गावडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, दगडू वीरकर, सूरज नांगरे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक बाजीराव ढेकले करीत आहेत.
हेही वाचा :
Nilesh Rane : निलेश राणे यांच्यावर पुणे महापालिकेची मोठी कारवाई
ब्रेकिंग: निवेदनावर मुख्यमंत्री शिंदेंची खोटी सही, शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार
धक्कादायक : शालेय पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा
ब्रेकिंग : हजारो आदिवासींचे आंदोलन; रस्त्यावरच पेटवल्या चूली
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे