Friday, March 29, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड शहरात गणपतराव देशमुखांना सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहिली श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड शहरात गणपतराव देशमुखांना सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहिली श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उर्ध्वयू, आदर्श राजकारणाचा परिपाठ, राजकारणाला सामान्य लोकांच्या कल्याणाचे साधन समजून आयुष्यभर ज्यांनी आदर्शवत राजकारण केले, आणि तब्बल अकरा वेळा आणि सलग चोपन्न वर्षे महाराष्ट्र विधानसभेमध्ये सांगोला मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले, असे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामान्य लोकांचा खराखुरा प्रतिनिधी महाराष्ट्राने गमावला आहे. असा नेता पुन्हा होणे जवळजवळ अशक्यच. त्यांच्या जाण्याने केवळ शेतकरी कामगार पक्षात आणि सांगोला मतदारसंघातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक कार्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे यांनी व्यक्त केली.

सलग ११ वेळा आमदार असलेले महाराष्ट्रातील एकमेव अजातशत्रू ऋषितुल्य नेतृत्व डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा दीपस्तंभ होता, विधान सभेत एसटीने प्रवास करून जाणारे गणपतराव देशमुख कामगार, शेतकरी, शेतमजुरांचे नायक होते.

– गणेश दराडे (माकप)

शेतकरी कामगार पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी पक्षाची चांगली धुरा सांभाळली आणि अशाप्रकारे सातत्याने निवडून येण्याची किमया एखादा आमदार करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचार गेली पंचावन्न वर्ष एकच टेबल एकाच खुर्चीवर बसून मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवणारे आणि कोणताही लवजमा न करता अधिवेशनाला थेट राज्य एसटीने प्रवास करणारे  एकमेव आमदार. सतत अकरा वेळा निवडून येऊन ज्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

– काशिनाथ नखाते (कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र)

१९७२ च्या दुष्काळाचा काळ होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोलापूरला भेट दिली, त्यावेळी वसंतराव नाईक वगैरेंच्यासोबत गणपतरावांनी विमानतळावर इंदिरा गांधी यांची भेट घेतली. दुष्काळाशी संबंधित अनेक मागण्या त्यांनी इंदिरा गांधींकडे केल्या. त्याचवेळी एक मागणी होती, समान काम समान दाम अशी. त्यावेळी पुरुषांना तीन रुपये आणि महिलांना अडीच रुपये मजुरी होती. गणतपतरावांनी ती समान करण्याची मागणी केली आणि इंदिरा गांधी यांनी तिथल्या तिथे ती मंजूर केली.

– पावसु क-हे (सामाजिक कार्यकर्ता)

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय