Wednesday, February 12, 2025

महापालिका नाट्यगृहाचे खाजगीकरण कोणाचे पुनर्वसन करण्यासाठी इम्रान शेख यांचा सवाल

खाजगीकरण मागे न घेतल्यास नाट्यगृहातील कार्यक्रम बंद पाडण्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर :
महानगरपालिकेने शहरातील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह सोडून उर्वरित आचार्य अत्रे नाटयगृह, अंकुशराव लांडगे नाटयगृह, नटसम्राट निळू फुले नाटयगृह या नाटयगृहांचे खाजगीकरण करण्याचा घाट घातलेला असून या खाजगीकरणाला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोध दर्शविला आहे.

‘खाजगीकरणामुळे नाट्यगृहाचे भाडेवाढ होऊन त्याचा परिणाम साहित्यिक कार्यक्रम, नाट्य प्रयोग करणाऱ्या संस्था, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय कार्यक्रम व कामगार मेळावे, राजकीय पक्षांचे कार्यक्रम यावर परिणाम होऊ शकतो. महापालिका नाट्यगृहाचे खाजगीकरण कोणाचे पुनर्वसन करण्यासाठी करत आहात असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी केला आहे.

यावेळी बोलताना चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड म्हणाले, महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा एकतर्फी निर्णय घेताना शहरातील कलाकारांना अथवा सामाजिक, राजकिय क्षेत्रातील मान्यवर व नागरिक यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊ नये , अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तीव्र अंदोलन घेण्यात येईल असा इशारा दिला आहे.

महापालिका उपायुक्त प्रदीप जांभळे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, पिंपरी विधानसभा अध्यक्ष आयुष निंबाळकर, युवक उपाध्यक्ष ओम शिरसागर, सचिव पियूश अंकुश, रुबान शेख, सनी वाघमारे उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles