जुन्नर : जुन्नर तालुक्यात महाराजस्व अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी आदिवासी विकास प्रकल्प स्तरीय समिती सदस्य दत्तात्रय गवारी यांनी एका निवेदनाद्वारे नायब तहसीलदार किल्ले यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विभागातील शेतीविषयक अनेक कामे प्रलंबित आहेत. आदिवासी जनतेच्या सोयीसाठी महाराजस्व आभियान राबवुन खातेफोड, वारसनोंद, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रेशनिंगकार्ड इत्यादी सेवा देऊन आदिवासी जनतेला सहकार्य कारण्याचे हेतुने महाराष्ट्र शासनाचे महाराजस्व आभियान लवकारत लवकर राबवावे, अशी मागणी केली आहे.
नायब तहसीलदार किर्वे यांना निवेदन देतेवेळी दत्तात्रय गवारी, ॲड.सचिन चव्हाण उपस्थित होते.
बाळहिरडा खरेदी प्रश्नावर किसान सभा घेणार लोकप्रतिनिधींच्या भेटी
ब्रेकिंग : माळशेज घाटात दरीत उडी मारून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
पुणे येथे 10 वी आणि 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 876 जागांसाठी भरती