Photo : Facebook/SFI |
सोलापूर : वाढीव प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क वाढीचे परिपत्रक तात्काळ मागे घ्या, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने शिवकुमार गणपूर परीक्षा विभाग संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांना निवेदन देण्यात आले.
एसएफआयने म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन दोनवेळा घोषित करण्यात आला. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. अजूनही पालकांच्या हाताला काम नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठ प्रशासनाने पालकांचे व विद्यार्थ्यांचे हीत लक्षात न घेता वाढीव प्रवेश शुल्क व वाढीव परीक्षा शुल्क वसूल करण्याचा काम करीत आहे. यामुळे गरीब कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणाबाहेर फेकले जातील. पालकांच्या डोक्यावर आर्थिक बोजा वाढविण्याचा काम विद्यापीठ प्रशासन व कुलगुरू करीत आहेत, असे म्हणत एसएफआयने निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
विद्यापीठ प्रशासन व कुलगुरूंनी वाढीव प्रवेश शुल्क परिपत्रक 30 नोव्हेंबर 2021 रोजी काढले. पण त्यावेळेस विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले नाहीत. 1 डिसेंबर ते 21 जानेवारी 2022 पर्यंत परिपत्रक बाहेर पडण्यास विलंब का लागला. विद्यापीठामध्ये नाईक समिती येणार होती त्यामुळे हे परिपत्रक जाहीर करण्यात आले नाही. नाईक समिती 21 जानेवारी 2022 रोजी विद्यापीठात आले. सर्वेक्षण केले मीटिंगा झाल्या. आणि जशी नाईक समिती माघारी गेली. त्यानंतर हा परिपत्रक बाहेर काढण्यात आले. आणि परीक्षा शुल्कामध्ये ही भरमसाठ वाढ करण्यात आली असा आरोप एसएफआयने केला आहे.
नवजात मुलासाठी आईने प्राण दिल्याच्या व्हायरल पोस्टचे वाचा सत्य !
विद्यापीठ प्रशासन व संबंधित विभागाच्या संचालक, अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाढीव प्रवेश शुल्क परिपत्रक रद्द करून ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले त्यांचे परत करण्यात यावे. तसेच, लॉकडाऊन काळातील घेतलेले परीक्षा शुल्क तात्काळ परत करण्यात यावे, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने केली आहे. अन्यथा एसएफआयच्या नेतृत्वात सर्व महाविद्यालये बंद करून विद्यार्थ्यांना घेऊन विद्यापीठावर मोर्चा काढून आंदोलन करु असा इशारा देण्यात आला आहे.
ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला !
यावेळी शिष्टमंडळात एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, जि.क.सदस्य दत्ता हजारे गेले होते.