कोकण : बारसू येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. मात्र, हा प्रकल्प होण्यापूर्वी माती सर्वेक्षण आणि इतर प्रक्रिया पार पाडली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे.त्यामध्ये विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दर्शविला आहे.
आंदोलक महिला शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देत असतांना पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. पोलिसांनी हटविण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यामध्ये अनेक महिलांना पोलिसांनी मारले, फरफटत नेले, याशिवाय अश्रु धूरांच्या नळकांड्या फोडल्या त्यामुळे अनेक जण बेशुद्ध पडले आहेत. त्यामध्ये काहींना लागल्याने अस्वस्थ झाले आहे.
पोलिसांना विरोध करून सर्वेक्षण रोखण्यासाठी जात असतांना झटापट झाली त्यात मोठा गोंधळ झाला होता. आंदोलकांना हटविण्यासाठी पोलिसांनी जे प्रयत्न केले त्यात काही जण जखमी झाले आहे. त्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले असून आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. जमीन काही कुणाची नाही, त्यामुळे आमच्यावर दादागिरी करू नका म्हणत आंदोलक विरोधावर ठाम आहे.
काही आंदोलकांनी तर आमचा विरोध कायम राहील. जमीन घेऊ देणार नाही. आम्हाला मारायचे मारा, मारून टाकायचे तर मारून टाका पण आम्ही मागे हटणार नाही म्हणत कडाडून विरोध केला आहे. यामध्ये महिला आंदोलकांना यामध्ये लागलं असून त्यांच्यावर उपचार कोण करणार? पोलिसांच्या आई बहिणी असतात तर ते असे वागले असतात का? असा सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.