Saturday, March 15, 2025

समाजात दुही निर्माण कराल, तर पोलीस कारवाई करणारच – अजित पवार

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून त्यात, ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा’, असे म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर उत्तर दिले आहे.

सत्तेचा ताम्रपट कुणीच घेऊन आले नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. काही जण अल्टीमेटम देतात हे बरोबर नाही, हे हुकूमशाही राज्य नाही, हे लोकशाहीचे राज्य आहे. आपल्या वक्तव्यांनी समाजात दुही निर्माण होत असेल तर पोलिस कारवाई करणारच, असे अजित पवार यांनी राज ठाकरे यांना सुनावले आहे. इस्लामपूर येथे आयोजित राष्ट्रीय २४ व्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.

ब्रेकिंग : संभाजीराजेंनी केली नवीन संघटनेची घोषणा, राजकीय भूमिकाही केली जाहीर

काही लोक राज्यात जाती – जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केला. सवंग प्रसिद्धीसाठी अयोध्येला जाण्याचा प्रकार असून सवंग लोकप्रियेतेसाठी व प्रसिद्धीसाठी हापापल्याचा प्रकार असून कमी खर्चात ती मिळते, असा टोलाही अजित पवारांनी राज ठाकरे यांचे नावन घेता लगावला आहे.

राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना पवार म्हणाले की, कोणी अल्टीमेटमची भाषा वापरु शकत नाही, ही हुकूमशाही नाही, लोकशाही आहे. मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, समाजात तेढ निर्माण होणार असेल, तर मग ती व्यक्ती मी जरी असलो तरी आपल्यावरही कारवाई करण्याचा अधिकारी पोलीस खात्याला आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 1 लाख रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी करण्याची संधी, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय कृषी संशोधन संस्थेत तब्बल 462 रिक्त जागांसाठी भरती, एका नामवंत शासकीय संस्थेत नोकरीची संधी


Related Articles

- Advertisement -

Latest Articles