Friday, March 29, 2024
Homeजिल्हाइचलकरंजी : लिंग भेदावर आधारित व्यवस्थेने स्त्रियांच्या पायात बेड्या घातल्या - प्रा....

इचलकरंजी : लिंग भेदावर आधारित व्यवस्थेने स्त्रियांच्या पायात बेड्या घातल्या – प्रा. मेघा पानसरे

कन्यामहाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा !

इचलकरंजी (कोल्हापूर) : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. मेघा पानसरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर कार्यक्रमाची सुरुवात सर्व महिला प्राध्यापिका यांच्या सत्काराने करण्यात आली. प्रमुख पाहुण्या यांनी आपल्या व्याख्यानात बोलत असताना भारतीय समाजव्यवस्थेने स्त्रियांना धर्म, जात संस्कृती, रूढी, परंपरा तसेच लिंग भेदावर आधारित व्यवस्थेने स्त्रियांच्या पायात ज्या बेड्या घातल्या आहेत, त्या कशा पद्धतीने संघर्ष करून सोडवायच्या याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मुलींंनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित ‘सावित्री मॉडेल’ चा अंगीकार करावा, असे वक्तव्य केले. 

सद्यस्थितीमध्ये सर्व स्त्रियांनी येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा स्वीकार करून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा चंग बांधला पहिजे. तसेच स्त्रियांच्या शरीराचे वस्तूकरण करून त्यांचा वापर करून भांडवलवादी विचाराच्या पुरुषसत्ताक पद्धतीने त्याचे बाजारीकरण कसे केले आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. 

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अध्यक्षीय मनोगतात प्रा. बाळासाहेब तराळ महिलांचे सक्षमीकरण कसे व्हायला हवे, यावर प्रकाश टाकला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संगीता पाटील यांनी केले, प्रसाद कुलकर्णी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रा. पल्लवी मिरजकर यांनी केले. प्रा. वर्षा पोतदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच इचलकरंजी परिसरातील विवेक वाहिनीचे सदस्य उपस्थित होते. समाजवादी प्रबोधिनी च्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय