Thursday, January 16, 2025
HomeNewsदेशासाठी खूप काही करण्याची इच्छा आहे, पण वेळ मिळत नाही. मग दैनंदिन...

देशासाठी खूप काही करण्याची इच्छा आहे, पण वेळ मिळत नाही. मग दैनंदिन जीवनात हे करा !

पुणे, दि. १७ : धावपळीच्या जीवनात आणि चंदेरी दुनियेत वेळेला अत्यंत महत्त्व आहे. मानवी जीवन हे धावते झाले आहे. नोकरी, व्यवसाय, कबाडकष्ट यामुळे मानवी जीवन जात्यात भरडल्यासारखे फिरते आहे. निसर्गसंपन्न देश हा धावपळीच्या दुनियेत दुर्लक्षित होत आहे. देशासाठी अनेकांनी बलिदान, योगदान, वेळ दिला. परंतु आपल्याला धावत्या जीवनामुळे वेळ भेटेना झाला आहे. अशावेळी आपण दैनंदिन जीवनात काही सकारात्मक बाबी करुन देवकार्यास हातभार लावू शकतो. आपल्या या कामामुळे देशाची साधनसंपत्तीच्या संवर्धनात आपला हातभार लागेल. भावी पिढ्यांसाठी ते सार्थक ठरेल.

1. पाण्याचा अपव्यय टाळा !

जल हे जीवन आहे. पाण्यावाचून माणूस प्राणी पक्षी जीवंत राहू शकत नाही. पाणी हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. शहरातील पाणी टंचाई आणि ग्रामीण भागात उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाण्याच्या झळा आपण पहातच आहोत. त्यामुळे पाणी हे जपून वापरले पाहिजे. गरजेनुसारस पाण्याचा वापर टाळला पाहिजे. पाणी आडवा, पाणी जिरवा ही मोहीम हाती घेऊन जलसंधारण केले पाहिजे.

2. विजेचा अनावश्यक वापर टाळा !

जसे पाणी हे राष्ट्राची संपत्ती आहे. तशी विज ही देशाची संपत्ती आहे. आपण म्हणाल की, आम्ही पैसे देतो, मग आम्ही ठरवू किती वापर करायचे ते. पण विज तयार करण्यासाठी पाणी, कोळसा, इंधन याचा मोठा साठा आपण खर्ची घालतो. हे सर्व नैसर्गिक साधन सपंत्तीचे मर्यादित स्त्रोत आहेत. त्यामुळे एका रुममध्ये बसल्यानंतर तर ला बल्ब बंद करु, झोपताना बल्ब करुन झोपावे.

3. झाडे लावा, झाडे जगवा !

नैसर्गिक समतोल राखण्यासाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. मानवाने आपल्या बुध्दीच्या जोरावर अथक प्रगती केली आहे. परंतु पर्यावरणाचा ऱ्हास थांबला नाही, तर मानवी जीवन धोक्यात आहे. त्यासाठी निसर्गातील सर्वच घटकांचे, परिसंस्थांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. अधिवास असलेली झाडे लावणे, संवर्धन करणे, उजाड माळरानावर बिया फेकणे, फळे आणल्यानंतर बिया कचऱ्यात न टाकता, रस्त्याच्या कडेला किंवा झाड – झुडपात, काटेरी झुडपात टाकाव्यात. 

4. जाती – धर्माचा आदर करा !

भारतीय संविधानात देशातील विविधतेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. ती विविधता, परंपरा, सण, उत्सव, भाषा टिकवणे आपले कर्तव्य आहे. परंतु हे आपल्या घरापुरते मर्यादित असले पाहिजे. भारतीय संविधानाने सार्वजनिक जीवनात मानवता हाच धर्म दिला आहे. आपला धर्म, जात आपल्या उंबरठ्याच्य आताच ठेवली पाहिजे. सार्वजनिक जीवनाव वावरताना माणूस म्हणून वागले पाहिजे. “आम्ही भारताचे लोक” हे आपल्याला अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्या जाती, धर्माबरोबरच इतरांच्याही जाती धर्माचा आदर केला पाहिजे. हेच भारत एकसंध चे आदर्शवत कार्य आहे.

5. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करा !

भ्रष्टाचार ही भारताला लागलेली कीड आहे. आपण सार्वजनिक जीवनात वावरत असताना “मी लाच देणार नाही, मी लाच घेणार नाही” हे तत्त्व अंगीकारले पाहिजे. लोभाची भावना न ठेवता सत्यधर्माचा अंगीकार करणे गरजेचे आहे. मानवी जीवन एकदाच लाभते, काही तरी उल्लेखनीय कार्य, कर्तृत्व करण्याची ही एकच संधी असते. त्या संधीचे सोनं केलं पाहिजे. भ्रष्टाचार देशाला दारिद्र्य, गुन्हेगारी, द्वेष, अंधश्रद्धा, तणावात घेऊन जाणारे आहे. मानवी विकासातील तो मोठा अडसर आहे. त्यामुळे मानवाच्या शाश्वत विकासासाठी सत्याने काम करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराला गाडले तर देश उन्नतीकडे जाईल.

नवनाथ मोरे, पुणे


संबंधित लेख

लोकप्रिय