Devendra Fadnavis : गेल्या तीन वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फुट पडली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे विधान केले आहे. मी पुन्हा येईल ही सिंगल लाईन कधीच नव्हती. मी पुन्हा येईल याबद्दल बऱ्याच गोष्टी होत्या. असे म्हणत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित मुलाखतीत फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावेळी फडणवीसांनी मी पुन्हा येईल, तर मी आलोच. जरासा वेळ लागला पण मी आलो तर दोन्ही पक्ष फोडूनच आलो. माझा मूळ स्वभाव हा संयमी आहे. उत्तर द्यावं लागतच पण, वेळ पाहावी लागते, असे वक्तव्य यांनी केले.
मी पुन्हा येईन हे वाक्य नव्हतं
फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा येईन हे वाक्य नव्हतं. त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं. लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण, उध्दव ठाकरे यांनी स्वार्थासाठी पाठीत कांजिर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं. नव्हतो आलो तेव्हा टीका झाली, हे होत राहतं. पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष तोडून आलो.
हे ही वाचा :
धक्कादायक : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू
कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना
जुन्नर : मुलीच्या बालविवाह प्रकरणी आई-वडिल, नवरदेव, सासु-सासरे, भटजीसह 8 जणांवर गुन्हा
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज सांगता सभा
अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक