Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:मानवी हक्क दिन विविध कार्यक्रमाने साजरा काळुराम लांडगे यांना मानवाधिकार पुरस्कार.

PCMC:मानवी हक्क दिन विविध कार्यक्रमाने साजरा काळुराम लांडगे यांना मानवाधिकार पुरस्कार.

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था,पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक मानवी हक्क दिनानिमीत्त ‘जागर मानवी हक्काचा’ या कार्यक्रमाचे आयोजन पंडित जवाहरलाल सांस्कृतिक भवनात घेण्यात आला.या कार्यक्रमात पोलीस तक्रार प्राधिकरण अध्यक्ष आर व्ही जटाळे (नि.न्यायधीस सत्र न्यायालय) म्हणाले की,”मानवी हक्काचे रक्षक असलेल्या न्याय व्यवस्थेने संवेदनशील मानवी हक्क उल्लंघनाची प्रकरणे हाताळणे गरजेचे आहे.”
यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांनी विधी सेवा प्राधिकरण आर्थिकदृष्ट्या मागास वंचीत घटकांच्या न्यायासाठी विधी साह्य देऊन त्यांच्या मानवी हक्कांचे रक्षण केले जाते.पैशाच्या अभावी कोणीही न्यायापासून वंचित राहू नये पीडितांनी विधी साहाय्यासाठी प्राधिकरणाशी संपर्क करावा,असे आवाहन केले.या कार्यक्रमात दैनिक आज का आनंदचे संपादक शाम आग्रवाल यांनी वक्त केले.

या कार्यक्रमात ॲड.असीम सरोदे यांनी मानवी हक्क संरक्षणाच्या यंत्रणा जर त्यांच्या आधिकारचा वापरच करणार नसतील तर त्या यंत्रणा बंद करून मानवी हक्काचे स्पेशल कोर्ट करावेत,अशी भूमिका मांडली.या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रातून मानवतेच्या दृष्टीने सामाजिक कार्य करीत असलेल्या व्यक्ती,संस्था,संघटना यांच्या कार्याला अधिक स्फूर्तीबळ मिळावे,याहेतूने त्यांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सोनल पाटील,सुरेंद्रकुमार मानकोसकर (जी.एस.टी.आयुक्त),समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष जाधव,ॲड.असीम सरोदे, श्याम आगरवाल संपादक,दैनिक आज का आनंद, तहसीलदार मदन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात मानवाधिकार पुरस्कार काळुराम लांडगे (कामगार क्षेत्रातून),बी.पी. माळी. (प्रशासकीय) यांना मानवाधिकार पुरस्काराने गौरविण्यात आले.
अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर,संचालक अण्णा जोगदंड यांनी दिली.शकील शेख,मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर संगिता जोगदंड,मीना करंजावणे, मनीष देशपांडे,हरिभाऊ मंजुळे,विकास शहाणे आबास शेख,रवी भेंकी,अतिश गायकवाड,अक्षय जगदाळे,शंकर नानेकर,स्वप्निल कुचेकर,प्रकाश वीर,सारंगी करंजावणे, आकाश भोसले ,राम पाटील यांनी सहभाग घेतला.

संबंधित लेख

लोकप्रिय