Saturday, October 12, 2024
Homeजिल्हामुरूड बीचवर पर्यटकांची हाऊसफुल गर्दी

मुरूड बीचवर पर्यटकांची हाऊसफुल गर्दी

दापोली : दापोली तालुक्यातील प्रसिद्ध अशा मुरूड बीचवर पर्यटकांची हाऊसफुल गर्दी पाहायला मिळत आहे. समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजलेला पाहायला मिळत आहे. 25 डिसेंबर ख्रिसमस-नाताळ व 26 डिसेंबर रोजी रविवार अशी सलग 2 दिवस सुट्टी असल्याने अनेक पर्यटक बीचवर आनंद लुटायला आलेले आहेत. 

मुरूड बीच हा अत्यंत सुंदर व स्वच्छ बीच म्हणून ओळखला जातो.कोरोना कालावधीत गेली पावणे दोन वर्षे बीच बंद होते.

आता शासनाने नियम शिथील केल्यामुळे अनेक पर्यटक मुरूड बीचवर आनंद लुटत आहेत. 

पर्यटक वाढल्यामुळे हाॅटेल व्यवसायिक सुद्धा सुखावलेले आहेत. अत्यंत सुरक्षित असा हा समुद्र किनारा मानला जातो.कारण येथे पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा धोका नसतो.धोका उद्धभवल्यास स्थानिक लोकांचे पर्यटकांना चांगले सहकार्य मिळते. निसर्ग सौंदर्य व स्वच्छ बीच म्हणून पर्यटक येथे येण्यास पसंत करतात.

सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबासह येथे बीच वर मौज मजा करायला आलो आहोत. येथे येऊन आम्हाला खूप बरे वाटत आहे. आम्ही बोटवर बसलो,घोडागाडी वर बसलो, फोटो काढलेत, समुद्रात आंघोळ करतोय, आम्हाला खूप मजा येत आहे. अशा शब्दांत बीचवर आलेल्या पर्यटकांनी आपला आनंद व्यक्त केला. मुरूड बीच वर सध्या हाऊसफुल गर्दी पाहायला मिळत आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय