Thursday, July 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीययुक्रेन मधील भीषण परिस्थितीत या जोडप्याने केले लग्न, कारण ऐकून तुम्ही व्हाल...

युक्रेन मधील भीषण परिस्थितीत या जोडप्याने केले लग्न, कारण ऐकून तुम्ही व्हाल भावूक

                 

युक्रेन : भीषण परिस्थिती, स्फोटांचे आवाज, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ असं सगळं सुरू असताना एका जोडप्याने मात्र लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं नेमकं कारण ऐकून तुम्ही भावूक व्हाल.

CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, 21 वर्षीय यारयाना अरीएवा (Yaryana Arieva) आणि तिचा पार्टनर 24 वर्षीय प्रियकर स्वियातोस्लाव फर्सिन (Seiyatoslaw farsin) यांनी मधील सेंट मायकल चर्च येथे लग्न केले. खरं तर त्यांना हेच 6 मे रोजी लग्न करायचे होते. डनीपर नदीवर उभ्या असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये अत्यंत आनंदात ते हा सोहळा साजरा करणार होते.

युद्धामध्ये सुरू असलेल्या या भयानक हिंसाचाराच्या दरम्यान अचानक सर्व काही बदललं. “आम्ही जिवंत राहू कि नाही याची माहिती आम्हाला नव्हती म्हणून लगेचच लग्न करण्याचा निर्णय घेतला”. अशी प्रतिक्रिया जोडप्याने दिली. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वत्र याचीच चर्चा रंगली आहे.

“देशात परिस्थिती अत्यंत भीषण असून आम्ही आमच्या देशासाठी सध्या लढत आहोत. कदाचित आमचा मृत्यू देखील होऊ शकतो म्हणूनच आम्ही असे पाऊल उचलले” असे मत त्यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय