Thursday, March 28, 2024
Homeजिल्हासुशिलकुमार पावरा इंटरनॅशनल आॅयडाल अवार्ड 2021 ने परिवारासह सन्मानित

सुशिलकुमार पावरा इंटरनॅशनल आॅयडाल अवार्ड 2021 ने परिवारासह सन्मानित

मिस युनीवर्स क्वीन व ऑफ्रीकन स्काॅलर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान 

रत्नागिरी : मिस शिल्पी अवस्थी मिसेस इंडिया इंटरनॅशनल, युनीवर्स क्वीन व सनान्सी ना बायडम ऑफ्रीकन स्काॅलर व सोशल अॅक्टीवीस्ट यांच्या शुभहस्ते सुशीलकुमार पावरा यांना परिवारासह इंटरनॅशनल ऑयडल अवार्ड 2021 ने दिनांक 18 सप्टेंबर 2021 रोजी नाशिक येथे सन्मानित करण्यात आले. ब्लॅक लेडी अवार्ड, पदक, विशेष  प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय प्रतिष्ठित व्यक्तींकडून हा सन्मान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना पुरस्कार विजेते सुशिलकुमार पावरा सोबत त्यांच्या पत्नी पिंगला पावरा, मुलगा हॅरी पावरा व कन्या हॅलन पावरा उपस्थित होते.

निर्वाण फाऊंडेशन नाशिक यांनी हा पुरस्कार सोहळा आदित्य हाॅल गुरू गोविंद सिंग काॅलेज इंदिरा नगर नाशिक येथे आयोजित केला होता. या पुरस्कार सोहळ्यात मिस युनीवर्स क्वीन शिल्पी अवस्थी, सनान्सी ना बायडम ऑफ्रीकन स्काॅलर व सोशल अॅक्टीवीस्ट, आरती प्रशांत हिरे समाजसेविका तथा माऊंटेन हायकर व ट्रेकर, विमलताई बोथरे जेष्ठ समाजसेविका, निर्वाण फाऊंडेशन नाशिकचे संस्थापक  अध्यक्ष  निलेश यशवंत आंबेडकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.  इंटरनॅशनल ऑयडल अवार्ड 2021 साठी देशभरातून अनेक स्पर्धकानी भाग घेतला होता. त्यापैकी समाजसेवा क्षेत्रातून सुशिलकुमार पावरा यांना सर्वाधिक मते मिळाली. तसेच सामाजिक कार्याची कागदपत्रे तपासणी करून सुशिलकुमार पावरा यांना समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

सुशिलकुमार पावरा यांची 150 वेळा उपोषण करणारे उपोषण कर्ता, लढाऊ शिक्षक, गायक, नृत्यक, कराटेपटू, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स म्हणूनही विशेष ओळख आहे. त्यांना टिक टाॅक स्टार म्हणून ही लोक ओळखू लागले होते. आपल्या गायकी व नृत्याने सुशिलकुमार पावरा यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली होती.

कला, क्रीडा, संगीत, शिक्षण, गायन, वादन, नृत्य, आरोग्य, समाजसेवा इत्यादी, विविध क्षेत्रातून उत्कृष्ट कामगिरी करणा-या पुरस्कार विजेत्यांना हा पुरस्कार निर्वाण फाऊंडेशन नाशिक तर्फे देण्यात आला. मला हा पुरस्कार मिळाल्याबद्धल मी निर्वाण फाऊंडेशन नाशिकचे खूप खूप आभारी आहे. माझ्यासाठी हा पुरस्कार खूपच महत्वाचा आहे. कारण या पुरस्कारामुळे समाजमानसात माझी चांगली ओळख निर्माण झाली आहे. समाजसेवा करताना मला खूपच अडचणी व संकटे आली तरी कुठेही न डगमगता आजही मी माझे सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे व पुढेही सुरूच ठेवणार आहे. समाजसेवेत संघर्ष मय कामगिरी केल्यामुळेच मला हा पुरस्कार बक्षीस स्वरूपात मिळाला आहे, असे मत सुशीलकुमार पावरा यांनी यावेळी व्यक्त केले.

सुशिलकुमार पावरा यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्धल आदिवासी समाजबांधवांकडून व इतर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनंदन करणा-या सर्व मित्रांचे सुशिलकुमार पावरा यांनी आभार मानले आहेत.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय