Saturday, October 5, 2024
Homeजिल्हाBhima Koregaon : विविध मागण्यांसाठी भीमसैनिकांचा भीमा कोरेगाव ते मुंबई सन्मान मार्च

Bhima Koregaon : विविध मागण्यांसाठी भीमसैनिकांचा भीमा कोरेगाव ते मुंबई सन्मान मार्च

पुणे : भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या विविध मागण्यांसाठी भीमा कोरेगाव ते मंत्रालय आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर सन्मान मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. हा मार्च १२ सप्टेंबर २०२४ रोजी भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी लाखो भीमसैनिकांना या सन्मान मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या मार्चच्या माध्यमातून अनेक मागण्या मांडण्यात येणार आहेत. जय स्तंभाच्या दुरुस्तीची मागणी ही प्रमुख मागण्यांपैकी एक आहे. जय स्तंभाच्या वरील भागातून दरवर्षी पावसाचे पाणी जाऊन जय स्तंभाच्या आतून बाहेर पडत असल्यामुळे जय स्तंभ फुगलेल्या अवस्थेत दिसत आहे. या स्थितीत जय स्तंभावर कुठल्याही क्षणी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे जय स्तंभाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीतील आणि भारत बंदवेळी दाखल झालेल्या अंदाजे ३०,००० कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीही करण्यात येत आहे. शौर्यदिन नियोजनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी, तसेच पुणे दर्शनमध्ये जय स्तंभ आणि छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळांचा समावेश करण्यात यावा, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. जय स्तंभावर लावण्यात आलेली १९७१ चे युद्धातील सैनिकांची काळी पाटी काढून ती दुसऱ्या ठिकाणी मानसन्मानाने लावण्याचीही मागणी करण्यात आली आहे. (Bhima Koregaon)

हा सन्मान मार्च कोरेगाव भीमा, पिंपरी चिंचवड, लोणावळा, पनवेल, वाशीमार्गे चैत्यभूमी दादर आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर जाणार आहे, अशी माहिती कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी दिली आहे.

Bhima Koregaon

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

संबंधित लेख

लोकप्रिय