नवी दिल्ली : देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल मध्ये भाजपाचा पराभव झाला असला तरी भाजपने आसाममध्ये दणदणीत विजय मिळवत आपली घरवापसी केली आहे. काँग्रेस आणि भाजपात ही चुरस होती. यामध्ये भाजपानं सुरूवातीपासूनच आघाडी घेतली.
भाजप आघाडीने बहुमताचा आकडा पार करत ७५ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आघाडीला ५० जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे भाजपाला स्पष्ट जनमत मिळताना दिसत आहे.
आसाममध्ये भाजपला ६० जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला २९ त्या खालोखाल ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला १६, आसाम गण परिषद ९, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल ६, बोडोलॅन्ड पीपल्स फ्रंट ४, सीपीएम १ तर अन्य १ अशा जागा आसाममध्ये मिळाल्या आहेत.
दरम्यान, पडूचेरीमध्ये सुद्धा भाजप आघाडीने बाजी मारली आहे. भाजप आघाडीच्या १६ जागा निवडून आल्या आहेत तर काँग्रेस आघाडीने ८ मिळवल्या आहेत तर इतर ६ जागा निवडून आल्या आहेत.
अधिक वाचा
पाच राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर ; कोणत्या पक्षाला कुठे किती जागा मिळाल्या वाचा एका क्लीकवर
तमिळनाडूमध्ये स्टेलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमकेचा दणदणीत विजय ; या पक्षाला मिळाल्या इतक्या जागा
केरळ मध्ये पुन्हा डावे ; पिनराई विजयन यांनी घडवला इतिहास