Friday, March 29, 2024
Homeराष्ट्रीयडॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण, महागाई वाढण्याची भीती

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण, महागाई वाढण्याची भीती

मुंबई, 15 जुलै : भारतीय रुपयात डॉलरच्या तुलनेत घसरण सुरूच आहे. आज (गुरुवारी) रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. रुपयाची किंमत एका डॉलरच्या तुलनेत आजवरच्या सर्वाधिक 79.90 रुपये या पातळीवर पोहोचली. रुपया गेल्या 5 वर्षांत डॉलरच्या तुलनेत 19 % पर्यंत कमकुवत झाला.

भारतीय रूपयात सातत्याने होत असलेली घसरण पाहता सर्वच स्तरावर चिंता वाढली आहे. गेल्या एका वर्षात रुपयात 6.8% ची घसरण आली. म्हणजे, विदेशातून येणारी सामग्री गेल्या एका वर्षात आपोआप 6.8% महाग झाली. रुपयामध्ये सुरु असलेल्या या घसरणीचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरही होणार आहे. मात्र रिझर्व्ह बँकेकडून रुपयात सुरु असलेली घसरण कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

भारत कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात करतो. भारतातील इंधनाची गरज भागवण्यासाठी 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. सरकारी इंधन कंपन्यांकडून डॉलरमध्ये कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्यास भारतीय इंधन कंपन्यांना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अधिक डॉलर मोजावे लागतील. विदेशात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनाही जास्त रुपये मोजावे लागतील. मोबाइल, ऑटो पार्ट्‌स आदीही महाग होऊ शकतात. त्यामुळे महागाई वाढण्याची भीती आहे.

हेही वाचा :

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

सरपंच आणि नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडून देता येणार

राज्यात अमृत २.० अभियान राबविणार, काय आहे ‘अमृत २.० अभियान’

‘त्या’ व्यक्तींना आता पुन्हा मिळणार दरमहा १० हजार मानधन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 16 जुलै 2022 रोजी मुलाखत

पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 15 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय