(मुंबई) :- अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या जाण्याने सर्वच हळहळ व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर लोकांनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला बॉलिवूड मधील काही लोक जबाबदार असल्याचे म्हंटले जात होते. अशात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी बॉलिबूडमधील अनेक बड्या हस्तींची नावं समोर येतायत आणि आम्ही त्या सर्वांची कसून चौकशी करू असं म्हटलं आहे.
यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय कि, “सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टी व्हायरल होतायत. अनेक प्रकारच्या वावड्या उठतायत. अशा बातम्यांसोबत किंवा उठणाऱ्या वावड्यांसोबत कुणीतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव जोडलंय. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष किंवा पक्षाची कोणतीही विंग या कॉंट्रोव्हर्सी किंवा बातम्यांमध्ये सामील नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. “