Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC:युरोपियन देशात उच्च शिक्षणाची संधी!!! पीसीईटी-एज्युकेरॉन इंटरनॅशनल मध्ये शैक्षणिक करार

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१३-भारतीय विद्यार्थी,प्राध्यापकांना उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.एज्युकेरॉन इंटरनॅशनलच्या माध्यमातून या संधींचा फायदा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या(पीसीईटी) शैक्षणिक समुहातील विद्यालये,पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयू) विद्यार्थी,प्राध्यापकांना होईल असा विश्वास एज्युकेरॉन इंटरनॅशनलचे संचालक वैष्णव केरॉन यांनी व्यक्त केला.
जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि एज्युकेरॉन इंटरनॅशनल यांच्या मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार बुधवारी (दि.१३)पीसीईटीच्या कार्यालयात करण्यात आला.यावेळी एज्युकेरॉनच्या विद्या स्वामी,राजश्री वैष्णव,गौरव वेदा,विलास जैन,पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे,उपाध्यक्षा पद्माताई भोसले,सचिव विठ्ठल काळभोर,खजिनदार शांताराम गराडे,विश्वस्त हर्षवर्धन पाटील,उद्योजक नरेंद्र लांडगे,अजिंक्य काळभोर,कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई,पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ.मणीमाला पुरी,समन्वयक डॉ.ऐश्वर्या गोपालकृष्णन,पीसीसीओईचे उपसंचालक डॉ.नीळकंठ चोपडे,प्राचार्य डॉ.हरीश तिवारी,प्राचार्य डॉ.महेंद्र सोनवणे,प्राचार्य डॉ.गणेश राव,प्राचार्या डॉ.बिंदू सैनी,संचालिका डॉ.कीर्ती धारवाडकर,डॉ.रोशनी राऊत,डॉ.केतन देसले आदी उपस्थित होते.

---Advertisement---


पीसीईटीच्या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणाऱ्या आणि उच्च शिक्षण परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना एका छताखाली अनेक सुविधा मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना युरोपियन शिक्षण संस्था,औद्योगिक कंपन्या,आस्थापना,रोजगारसंधी,संशोधन,कार्यशाळा,शिष्यवृत्ती यांची माहिती व्दिपक्षीय संयुक्त शैक्षणिक प्रकल्प अशा अनेक योजनांचा फायदा घेता येईल,असे डॉ.मणीमाला पुरी यांनी सांगितले.

एज्युकेरॉन इंटरनॅशनल ही सहा वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेजागतिक स्तरावर १६० देशांमधील शैक्षणिक,बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्या बरोबर काम करत आहेत.संशोधन आणि विकास,प्रगत तंत्रज्ञान यामध्ये कार्य करणारी एज्युकेरॉन इंटरनॅशनल ही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.नॉर्वे,तुर्की,जर्मनी,कॅनडा यांच्या बरोबर संयुक्त शैक्षणिक प्रकल्प सुरू केले आहेत. विद्यार्थी,प्राध्यापकांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांना उत्तेजन देऊन विशेष सहाय्य केले जाते.तसेच परदेशी भाषा शिक्षण,क्रीडा स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली जाते,असे वैष्णव केरॉन यांनी सांगितले.
कार्यक्रमास विविध विविध शाखांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.आभार डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी मानले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles