Tuesday, March 11, 2025

कोव्हीडमुळे मृत झालेल्या नोकरदारांच्या वारसांना पीएफ पेन्शन साठी मदत केंद्र – नगरसेवक एकनाथ पवार यांची घोषणा

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पिंपरी चिंचवड : कोव्हीडमुळे मृत झालेल्या नोकरदारांच्या वारसांना पीएफ पेन्शन साठी पूर्णानगर येथील कार्यालयात मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक एकनाथ पवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोरोना महामारीच्या काळात शहरात अनेक नोकरदारांचे मृत्यू झालेले आहेत.कामगार निवृत्ती वेतन कार्यालय (EPFO) पूर्वीच्या नियमानुसार नोकरदार सलग 10 वर्षे पी एफ सभासद असल्यावर तो आणि त्याचा वारस  निवृत्ती वेतन पेन्शन मिळण्यास पात्र ठरत होते. 

हेही वाचा ! राजकीय पक्षांची गरिबी हटावची घोषणा कागदोपत्रीच : बाबा कांबळे

कोरोना महामारीच्या कालखंडात देशभरातील कामगारांचे मृत्यू सर्वात जास्त झाले. त्यामुळे केंद्र सरकारने मार्च 2021 मध्ये पेन्शन नियमात बदल केले, त्यानुसार कोव्हीड आणि अन्य कारणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला आता पी एफ पेन्शन मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

अशा वारसांना प्रॉव्हिडंट फंड पेन्शन मिळवून देण्यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन, त्यांचे अर्ज भरून घेणे, आणि इतर सर्व शासकीय आर्थिक अनुदान मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर


१० वी – १२ वी झालेल्यांना संधी ! भारतीय सीमा सुरक्षा दलात २७८८ जागांसाठी भरती

नोकरीची संधी : नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles