Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणजुन्नर तालुक्यात विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी गारपीट

जुन्नर तालुक्यात विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी गारपीट

जुन्नर (पुुणे) : तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. धो – धो पाऊस विजांच्या कडकडाट कोसळत होता. तर काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात गारपीट पहायला मिळाली. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह पाऊस बरसला.

आज (दि. १३) तालुक्याच्या कुकडी खोरे, मिना खोरे, खिरेश्वर खोऱ्यासह पुर्व पट्टयात पावसाने जोरदार हजेरी लावली.

पुण्यासह राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे या आठवड्यात उन्हाचा चटका कमी राहणार आहे. 

 

संबंधित लेख

लोकप्रिय