जुन्नर : जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. जुन्नर परिसरात सायं. ६ नंतर अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. गारांसह पावसाने आगमन केल्यामुळे अनेक शेती पिकांना याचा फटका बसू शकतो.
आज जुन्नर परिसरात सायंकाळनंतर पावसाला अचानक सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसाने शहरी भागाला झोडपून काढले. गारपीटासह झालेल्या या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे काही प्रमाणात हवेतही गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना कडक उन्हा नंतर सुखद गारवा मिळाला. परंतु अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.