Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Heat wave : अकोला, जळगाव येथे जमावबंदीचे आदेश section 144

अकोला : विदर्भात असलेल्या अकोला शहरात शुक्रवारी 45.8 अंश सेल्सिअस आणि शनिवारी 45.6 अंश सेल्सिअस कमाल (Very high temperature) तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे’ पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी आदेश जारी केले आहेत.

आयएमडीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील उष्णतेची लाट तीव्र आहे. सामान्य नागरिक, रोजंदारी, अंगमेहनती आणि औद्योगिक कामगार, विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी कामगारांना सेवा पुरवणे, खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे व अन्य उपाय योजना प्रभावीपणे राबवण्याच्या आवश्यक त्या विशेष सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आदेशात दिल्या आहेत. त्यानुसार अंगमेहनती कामगार, औद्योगिक कामगार आदी सर्व कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. (district collector imposes Sec 144)

कामाच्या ठिकाणी कामगारांना उष्माघातापासून संरक्षणासाठी पुरेसे शेड, पंखे, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था, पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमोपचार पेटी ठेवणे, आदी जबाबदारी संबंधित आस्थापना मालकांची राहणार आहे. तसेच कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी 10 वाजतापर्यंत व सायंकाळी 5 नंतर कोचिंग सेंटर चालवावेत. असे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Akola)

---Advertisement---

याबाबत तक्रार असल्यास संबंधित ग्राम पंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, पोलिस प्रशासन, कामगार कल्याण विभागाकडे तक्रार करता येईल.

जळगाव जिल्ह्यातही तापमानाचा कहर पाहायला मिळत आहे, शुक्रवारी तर जळगाव येथे कमाल तापमानाची नोंद 45.4 अंश सेल्सिअस झाली आहे. सकाळपासून तापमान आणि असह्य उकाडा वाढत आहे. Jalgaon

दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येते. उष्णतेच्या झळा रात्रीपर्यंत कायम असतात. आगामी आणखी काही दिवस तीव्र उष्णता कायम राहणार असून वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेता जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष आदेश पारित केले आहेत. जळगाव जिल्ह्यात दि. 25 पासून ते 3 जुन पर्यंत शहरात कलम 144 चे आदेश लागू करून नागरिक, कष्टकरी कामगार, विदयार्थी यांचे उष्माघातापासून रक्षण करण्यासाठी आदेश जारी केले आहेत. (Jalgaon)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

---Advertisement---

आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !

12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!

दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी

ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू

इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?

खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली

मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क

पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक

---Advertisement---

ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles