नवी दिल्ली : मागील दोन आठवड्यात भारतातील उत्तरेकडील राज्यात सर्वात मोठी उष्णतेची लाट पसरली आहे. राजधानी दिल्लीत बुधवारी कमाल तापमान 52.3 अंशांवर पोहोचले, जे भारतातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे. (heat wave)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 2.30 वाजता दिल्लीतील मुंगेशपूर येथे 52.3 अंश सेल्सिअससह आतापर्यंतचा भारतातील सर्वात उष्ण दिवस नोंदवला गेला. ग्लोबल वॉर्मिंग मुळे गेल्या 2022 पासून जगभर तापमान वाढत असताना भारतात यावर्षी झपाट्याने वाढलेलं आणि वाढत जाणारं शहरीकरण हे शहरांतल्या वाढत्या उकाड्यामागचं प्रमुख कारण असल्याचं आयआयटी भुवनेश्वरच्या संशोधनातून समोर आले आहे. Global warming
अलीकडच्या काही दिवसांपासून राजस्थान, उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहार, झारखंड या राज्यात तापमान 45 अंश सेल्सअस पेक्षा अधिक वाढून उष्माघात वाढला आहे. एकट्या उत्तरप्रदेशात एकूण 164 लोक मृत्यू पावले आहेत.
कोणत्या राज्यात उष्णतेमुळे किती मृत्यू?
उत्तर प्रदेश 164
बिहार 73
महाराष्ट्र 12
ओडिशा 10
झारखंड 07
राजस्थान 05
आंध्र प्रदेश 02
दिल्ली 01
एकूण मृत्यू = 274
मार्च, एप्रिल मधील उच्च उष्णतेने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या हिमालयीन राज्यांनाही सोडले नाही, देशभरातील तापमानात एकूण वाढ झाल्याचे सूचित करते.Delhi news
संपूर्ण देशातील एकूण तापमान अती वेगाने वाढत आहे. उष्णतेच्या लाटा (Heat wave) आंध्र प्रदेश, तेलंगण व ओडिशात आल्या आहेत. यावर्षी मे महिन्यात मध्य भारतात तापमान वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे.
पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, आंध्र प्रदेश व तेलंगण या राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शहरांना तापमान वाढीचा धोका वाढत आहे.
नीरी संस्थेचे संचालक डॉ. अतुल वैद्य यांनी सांगितले आहे की, ” दाट लोकसंख्या, काँक्रीटच्या इमारती, वातानुकूलन यंत्रं यामुळे शहरातील तापमानात जास्त वाढ होत आहे. तसेच रस्त्यावरील एसी वाहनं देखील शहरातील तापमानवाढीला जबाबदार आहेत. एसी आतमध्ये जितकं थंड कतो, तितकीच बाहेर उष्णता फेकतो. तसंच काँक्रीटच्या घरांबद्दलदेखील आहे. काँक्रीटमुळे घरातून रेडीएशन बाहेर येतं. त्यामुळे सिमेंट काँक्रीटची घरं जास्त गरम होत आहेत, प्रशांत आणि हिंद महासागरातील सतत वाढत असलेल्या तापमानामुळे 2024 मध्ये संपूर्ण भारतात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा मागील वर्षी हवामान तज्ज्ञांनी दिलेला होता. यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला तर देशातील तापमान सर्वसाधारण होईल असा हवामान तज्ञांचा अंदाज आहे. India heat wave
हेही वाचा :
ब्रेकिंग : गॅस सिलिंडर स्वस्त ; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना दिलासा
ब्रेकिंग : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन
एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले
धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या
पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त
अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल
जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता