Heart attack : राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. बांदीकुईजवळील पंडितपुरा गावातील ज्योतिबा फुले शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकणारा विद्यार्थी यतेंद्र उपाध्याय (१६) याचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली.
यतेंद्र शाळेत पायी जात असताना अचानक बेशुद्ध पडला आणि त्यानंतर लगेचच रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शाळेच्या सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना कैद झाली आहे, ज्यामध्ये यतेंद्र शाळेच्या गॅलरीत बेशुद्ध पडल्याचे दिसत आहे.
यतेंद्र नेहमीप्रमाणे आपल्या पाठीवर दप्तर घेऊन शाळेत पोहोचला होता. शाळेच्या गॅलरीत चालताना अचानक तो बेशुद्ध पडला, ज्यामुळे शाळेत एकच खळबळ उडाली. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ बंदिकुई रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी सांगितले की, यतेंद्रच्या हृदयविकाराशी (Heart attack) संबंधित काही समस्या होत्या आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये आणि शाळेतील मित्रांमध्ये शोककळा पसरली आहे. यतेंद्रने नुकताच ५ जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा केला होता, त्यामुळे त्याच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबीयांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
बांदीकुई पोलिस स्टेशनचे अधिकारी प्रेम चंद यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, यतेंद्रच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शाळा प्रशासनानेही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे यतेंद्रच्या मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!
Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी
मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण
दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल